भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील रजा टावर आणि इंदिरानगर परिसरात सहा जण बेकायदेशीररित्या गांजाची सेवन करून धूम्रपान करणाऱ्या ८ जणांवर बाजारपेठ पोलिसांनी कारवाई केली आहे. याबाबत वेगवेगळे ८ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
भुसावळ शहरातील रजा टावर परिसरात् शाळेच्या पाठीमागे आणि इंदिरानगर कबीर मंदिराच्या मागे या दोन ठिकाणी काही इसम हे गांजाच्या नशा करत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने धडक कारवाई करत संशयित आरोपी अन्सार अहमद शेख (वय-२८) रा. जाम मोहल्ला भुसावळ, अशोक डेमा सपकाळे (वय-४६) रा. दीनदयाल नगर भुसावळ, यादव भिका खंडारे (वय-४८) रा. इंदिरानगर भुसावळ, मोहन देविदास सोनवणे (वय-४१) रा. भुसावळ, राम बापू मेश्राम (वय-२१) रा.पंचशील नगर भुसावळ, राजेश देविदास हाडे (वय-४५) रा.महात्मा नगर भुसावळ, विजय पुंजाजी कांडेलकर (वय-४०) रा.मोतीराम नगर भुसावळ आणि शाहिद अस्लम गौरी (वय-४१) रा. जाम मोहल्ला मस्जिद जवळ अशा ८ जणांवर कारवाई करून वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास भुसावळ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.