जामनेर ( प्रतिनिधी ) – मराठी नववर्षानिमित्त सामाजिक कार्यकर्ते प्रफुल लोढा यांनी जामनेर तालुक्यातील महाविद्यालये , जिल्हा परिषद शाळांमध्ये नैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या गुळाचे एक किलोचे पाकीट विद्यार्थ्यांना वाटप केले
शहरातील लोर्ड गणेशा शाळेत , पहूर येथील आर टी लेले महाविद्यालय , केंद्र जिल्हा परिषद मुलांची शाळा व कन्या शाळा पहूर पेठ आणि कसबे या शाळांमध्ये सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांच्या सामाजिक बांधिलकीचा उपक्रम म्हणून विद्यार्थ्यांना नैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या रसायनविरहित एक किलो गुळाचे पॅकेट आज वाटप करण्यात आले
पहुर शहरातील आर टी लेले महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्षस्थानी शेंदुर्णी येथील जीन प्रेसचे संचालक अरुण घोलप होते प्रमुख अतिथी म्हणून ईश्वरबाबू पतसंस्थेचे चेअरमन व भास्करराव पाटील संस्थेचे संचालक अँड एस आर पाटील , संस्थेचे उपाध्यक्ष साहेबराव देशमुख, पत्रकार गणेश पांढरे , माजी उपसरपंच रवींद्र मोरे , विकास सोसायटीचे माजी चेअरमन किरण खैरनार , माजी ग्रामपंचायत सदस्य विकास चौधरी, माजी सरपंच अशोक देशमुख, विनोद मेडिकलचे संचालक विनोद लोढा , रिखबचद लोढा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते
अध्यक्षीय भाषणातून अरुण घोलप यांनी सांगितले की स्व रायचंद लोढा , स्व सुभागचंद लोढा यांच्या आशीर्वादाने प्रफुल्ल लोढा यांनी तालुक्यात कोरोना कालखंडात गरजवंतांना किराणा सामानाचे वाटप करून दातृत्व दाखवून दिले गरिबांसाठी अहोरात्र दवाखान्याच्या कामासाठी वेळ देत आहेत या कार्यक्रमाबद्दल त्यांचे आभार मानतो प्रास्ताविक व सूत्रसंचालन विजय बोरसे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक आर बी पाटील यांनी मानले.