जळगाव (विशेष प्रतिनिधी)- जळगाव शहरातील सुप्रसिध्द व अग्रेसर साप्ताहिक केसरीराज व ऑनलाईन केसरीराज न्युज वेब पोर्टलच्या गोलाणी मार्केटमधील कार्यालयात जळगाव जिल्हा रायफल असोसिएशन व पायोनियर स्पोर्टस् असोसिएशनचे क्रीडा संचालक दिलीप गवळी व जिल्हा स्वयंसिध्दा प्रशिक्षण (महाराष्ट्र शासन)चे क्रीडा शिक्षक राजेंद्र जंजाळे यांनी सदिच्छा भेट दिली.
साप्ताहिक केसरीराजने यंदा दि.29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून क्रीडा दिन विशेष अंकाची पुरवणी प्रसिध्द करण्यात आली.यावेळी केसरीराज विशेष अंकाचे प्रकाशन जळगाव जिल्हा रायफल असोसिएशन व पायोनियर स्पोर्टस् असोसिएशनचे क्रीडा संचालक दिलीप गवळी व जिल्हा स्वयंसिध्दा प्रशिक्षण (महाराष्ट्र शासन) चे क्रीडा शिक्षक राजेंद्र जंजाळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी साप्ताहिक केसरीराज व ऑनलाईन केसरीराज न्युज वेब पोर्टलचे संपादक भगवान सोनार, कार्यकारी संपादक नरेश बागडे, संगणक प्रमुख उमेश देशपांडे व प्रतिनिधी शुभम सोनार आदि उपस्थित होते.









