मुंबई (वृत्तसंस्था) – अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआयने आज सलग तिसऱ्या दिवशी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी केली. तिच्या समवेत तिचा भाऊ शौविक हा देखील सांताक्रूझ येथील अतिथीगृहामध्ये सीबीआयच्या अधिकाऱ्यांसमोर उपस्थित झाला होता. शनिवारी सीबीआयच्या विशेष पथकाने रिया चक्रवर्तीची तब्बल 17 तास चौकशी केली होती.
या चौकशीत अमली पदार्थ पुरवण्यासंदर्भात गोव्यामधला हॉटेल व्यावसायिक गौरव आर्य याचे नाव पुढे आले होते. त्याची चौकशी सक्तवसुली संचालनालय तसेच अंमली पदार्थ नियंत्रण कार्यालयातर्फे करण्यात येणार आहे. दरम्यान आपण सुशांत सिंह राजपूतला कधीही भेटलो नाही.
मात्र रिया चक्रवर्तीला 2017 मध्ये भेटलो असल्याचे गौरव आर्य याने म्हटले आहे. चौकशीसाठी गोव्यावरून मुंबईसाठी निघालेला असताना विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्याने हे सांगितले. त्याला 31 ऑगस्ट रोजी ‘ईडी’पुढे चौकशीसाठी हजर होण्याचे समन्स बजावण्यत आले आहे.