नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या प्रसिद्ध विधीज्ञ प्रशांत भूषण यांना आज शिक्षा देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना १ रुपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र, १५ सप्टेंबरपर्यंत दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा तसेच ३ वर्षे प्रॅक्टिस करण्यावर बंदी घालण्यात येईल. अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

प्रशांत भूषण यांनी न्याययंत्रणेवर टीका करणाऱ्या दोन ट्विटसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात माफी मागण्यास नकार दिला होता. यावर न्यायालयाने सरकारी वकिलांना त्यांचा अभिप्राय मांडण्याची सुचना केली होती. त्यावेळी सरकारी वकिलांनी भूषण यांच्या वक्तव्यांना फार महत्व न देता त्यांना समज देऊन सोडून देण्याची सुचना केली होती. मात्र, २५ ऑगस्ट रोजी न्यायालयाने प्रशांत भूषण यांना दोषी ठरवत निर्णय सुरक्षित ठेवला होता. यावर आज न्यान्यायालयाने प्रशांत भूषण यांना १ रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच १५ सप्टेंबरपर्यंत हा दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा तसेच ३ वर्षे प्रॅक्टिस करण्यावर बंदी घालण्यात येईल. अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.







