नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – सार्वजनिक इंधन कंपन्यांनी गेल्या महिन्यात डिझेलच्या दरात वाढ केली होती. देशाची राजधानी दिल्लीत जून महिन्यात पेट्रोल पेक्षा डिझेल महाग झाले होते. डिझेलच्या दरात नव्याने 48 पैशांची वाढ करण्यात आली. मात्र दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत मोठ्या घोषणा केल्या आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘डिझेलवरील 16% व्हॅट (VAT) कमी केला आहे. यामुळे आता दिल्लीत डिझेल 8.36 पैसे प्रति लीटर स्वस्त होणार आहे.’ केजरीवाल यांनी डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
तत्पूर्वी, जून महिन्यात दिल्लीत पेट्रोलचा दर 79 रूपये 76 पैसे, तर डिझेलचा दर 79 रूपये 88 पैसे इतका झाला आहे. देशाची राजधानी दिल्लीत प्रथमच पेट्रोलपेक्षा डिझेल महाग झाले होते.