जळगाव (प्रतिनिधी) – मध्य रेल्वेत दि. २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जागरूकता सप्ताह पाळला जात आहे. याचाच एक भाग म्हणून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी गुरुवारी २९ रोजी अॅनिमेटेड चित्रफितींचे ई-विमोचन केले. या चित्रफिती मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने भ्रष्टाचाराविरूद्ध जनजागृती करण्यास मदत करण्यासाठी बनविलेले एक इनसहाऊस क्रिएशन्स आहेत. मध्य रेल्वेवरील सर्व विभाग आणि कार्यशाळांमध्ये, स्थानकांवर आणि कामाच्या ठिकाणी दाखविण्यासाठी या चित्रफिती पाठविल्या जातील. एस. के.पंकज, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक व मुख्य दक्षता अधिकारी आणि मध्य रेल्वेचे अन्य वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते.

क्षेत्रीय स्तरावरील वादविवाद स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये मुख्यालय, विभाग आणि कार्यशाळेतील विजेत्यांनी भाग घेतला.
आज मध्य रेल्वेच्या विविध विभागांतील दक्षता अधिकारी आणि निरीक्षक यांचे नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेमधील त्यांच्या काउंटरपार्टसह एक ऑनलाइन आंतर-सक्रिय सत्र देखील आयोजित करण्यात आला. या अधिवेशनात सुमारे ४० अधिकारी व निरीक्षक यांनी सक्रीय सहभाग नोंदविला.या सत्रात कार्यप्रणाली सुधारण्याच्या पद्धती आणि केस स्टडी सामायिक केल्या गेल्या.
सार्वजनिक जीवनात होणारे भ्रष्टाचार दूर करण्यासाठी मुख्य दक्षता आयोगाचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी मध्य रेल्वे उत्साहाने विविध उपक्रम राबवित आहे.
दक्षता जागृती सप्ताहाचा एक भाग म्हणून गेल्या दोन दिवसांत ऑनलाईन परिसंवाद, क्विझ स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, हिंदी निबंध स्पर्धा, वादविवाद व कर्मचारी तक्रार निवारण शिबीर असे विविध उपक्रम आयोजित केले गेले आहेत ज्यात मध्य रेल्वेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला.







