जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील गांधी उद्यानाजवळ विवेकानंद व्यायामशाळेत टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजीभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ऋषिकेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांना रक्ताची गरज भासत आहे. वाढदिवसाची मोठा गाजावाजा न करता टायगर गृपतर्फे रक्तदान शिबीर गांधी उद्यानाजवळील विवेकानंद व्यायाम शाळेत करण्यात आले होते. याप्रसंगी ६० रक्तदात्यांनी केले. आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी प्रमाणपत्र व ट्रॉफी रक्त दात्यांना वाटप करण्यात आले, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टायगर ग्रुपचे गौरव उमप, भगवान सोनार, जितू निंबाळकर, सोपान मानकर, मनोज बाविस्कर, प्रणव शर्मा, कुणाल बारी, नंदलाल मराठे, अंकुश मराठे, राहुल उमप,बंटी ताडे, आनंद घुगे आदींचे सहकार्य लाभले. तर रेडप्लस रक्तपेढीचे भरत गायकवाड, अभिषेक शेटे, अमोल शेलार, विवेक महाजन आणि प्रमोद पाटील, यांनी परिश्रम घेतले.







