नगर (वृत्तसंस्था) – पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट करोनावर प्रभावशाली लसीचे उत्पादन करणार असून संपूर्ण देशाचेच नाही तर जगाचे लक्ष सिरमकडे लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शनिवारी सिरमला भेट देवून लस उत्पादन प्रक्रियेची माहिती घेतली.
सिरमची लस संशोधनातील कामगिरी नगरसाठीही अभिमानास्पद ठरणार असून सीरम इन्स्टिट्युटचे संचालक डॉ. उमेश शाळीग्राम यांचे शिक्षण अहमदनगर कॉलेजमध्ये झालेे. डॉ. शाळीग्राम यांच्याबरोबर अमोल महाजन, आशुतोष खत्री, सनी धरक यांनी बायोकेमिस्ट्रीचे शिक्षण घेतले आहे. आजिनाथ नागरे, किशोर पंडागळे, वैभव खाडे आणि भारत बोरुडे यांनी अहमदनगर कॉलेजमधून शिक्षण घेतले असून ते सीरममध्ये कार्यरत आहेत. पंडागळे आणि बोरुडे यांचा कोरोना लस संशोधनात प्रत्यक्ष सहभाग आहेे.