जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा परिषदेच्या विषय समितीची सभा आज .मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली झाली या सभेत जिल्हा परिषदेचे शाहू महाराज सभागृह दुरुस्तीसह तातडीच्या विषयांना मंजुरी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या विषय समितीची सभा साने गुरुजी सभागृहात घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया होते .यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे यांचेसह जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख उपस्थित होते.या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन मंजुरी देण्यात आली. प्रामुख्याने तातडीने करावयाच्या विषयामध्ये जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहाची दुरुस्ती करण्यासह जिल्ह्यातील 290 जिल्हा परिषदेच्या शाळांच्या खोल्यांची दुरुस्ती बाला उपक्रमांतर्गत करण्यास मंजुरी देण्यात आली. इतर विषयावर चर्चा करण्यात येऊन तातडीने पूर्ण कामे करावयाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली.