मुंबई (वृत्तसंस्था) – मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी एका निनावी फोनद्वारे देण्यात आली आहे. त्यानंतर मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल झालं आहे मंत्रालयातील कंट्रोल रूमला बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे. निनावी धमकीचा फोन आल्यानंतर मंत्रालयातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. कथित बॉम्बचा तपास सुरु आहे. मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात आलेल्या हॉटलाईनवर सकाळी फोन आला.

या फोनवरून मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. सध्या मंत्रालयात सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली असून बॉम्ब शोधक व नाशक पथक मंत्रालयात दाखल झालं आहे.







