जळगाव ( प्रतिनिधी ) – भावी पतीने हिनवल्याने गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या कुर्हे (पानाचे) ( ता. भुसावळ ) येथील रामेश्वरी रवींद्र नागपुरे हिने आत्महत्या केली होती दोषींवर चौकशी करून कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आज पोलिस अधीक्षक डाँ. प्रवीण मुंडे यांनी बारी समाजाच्या शिष्टमंडळाला दिले.
साखरपुडा झाल्यानंतर रामेश्वरी रवींद्र नागपुरे हिला होणारा पती भूषण ज्ञानेश्वर पाटील बारी (रा.रावेर, ह. मु. नाशिक) याने मानसिक त्रास दिला तु जाड, गावंढळ असून मला नापसंद आहे, मी हे लग्न मोडणार आहे, अशी दमदाटी केली. 24 मार्चला रात्री अशी धमकी भूषणने दिली. हे असह्य झाल्याने रामेश्वरीने 25 मार्चरोजी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दोषी भूषणवर कारवाईसाठी बारी समाजाच्या शिष्टमंडळाने आज पोलीस अधीक्षक मुंडे यांची भेट घेतली रामेश्वरीला हिणवून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या भूषणवर कडक कारवाई करण्याची मागणी केली सहा दिवस उलटल्यानंतरही भुसावळ पोलिसांनी कारवाई न केल्याबद्दल शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांसमोर नाराजी व्यक्त केली. सर्व माहिती घेतली असून, दोषींची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले. निवेदन भुसावळ तालुका पोलिस ठाण्याला दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
या शिष्टमंडळात जळगावचे बी. टी. बारी, मनोज बारी, अतुल बारी, शाम बारी, कुर्हे येथील जितेंद्र नागपुरे, किशोर वराडे, संजय वराडे, सुभाष पाटील, परशुराम नागपुरे, जीवन नागपुरे, रविंद्र बनसोडे, अरुण बारी , सुरेखा बारी, निता बारी, कविता कोळी, पुष्पा बारी, दुर्गा बुंदे, सुरेखा नागपुरे, सोनल नागपुरे, नबाबाई पारधी, अनिता नागपुरे, तुळसाबाई बारी, रुखमाबाई बारी, यशोदा बारी, मीराबाई कोळी यांचा समावेश होता. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री , गृहमंत्री , विरोधी पक्ष नेते , पालकमंत्री , राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, माजी पालकमंत्री एकनाथराव खडसे, जिल्हाधिकारी, जिल्हा महिला आयोग व भुसावळ डीवायएसपी वाकचौरे यांनाही देण्यात आल्या आहेत.