जामनेर ( प्रतिनिधी ) – वाकडी येथे केंद्रस्तरीय शाळा पूर्व तयारी अभियानाच्या कार्यशाळेला शिक्षक आणि अंगणवाडी सेविका यांचा उत्फृर्त प्रतिसाद मिळाला
जि.प. शाळा वाकडी येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . सरपंच संगिता गायकवाड अध्यक्षस्थानी होत्या, वाकडीचे केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे यांच्या नियोजन केले होते कार्यशाळेत शैक्षणिक साहित्याची सजावट करण्यात आली होती स्वाती पाटील यांनी प्रास्ताविकातून शाळा पूर्व अभियानाची माहीती सांगितली क्रेंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे यांनी शाळेत अशा प्रयत्नांमुळे पाल्याची आकलन क्षमता वाढते, विद्यार्थ्यांच्या कानावरून विविध शब्द जातात, पुढील वर्षी शाळेत सेमी वर्ग सुरू करु अशी माहितीही दिली
या मेळाव्यात उपस्थित जि.प.उदु शाळेचे विद्यार्थी व मुख्याध्यापक अब्दुल जनाब व त्यांचे सहकारी हजर होते, या कार्यशाळेत निता पाटील, पूनम धेकले, सुर्याजी काकडे, स्वाती पाटील, सुनिता मोरे व ग्रामस्थांनीही सहभाग घेतला, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शाहा, शालेय समितीचे अध्यक्ष बंडू कोळी, विनोद तेली, शब्बीर तडवी, विलास जोशी, गोविंदा राजपूत, दिलीप राजपूत आदी उपस्थित होते, सुञसंचालन सुर्याजी काकडे यांनी केले .