मुंबई ( प्रतिनिधी ) – कांदिवलीत एका इसमानं तिघा महिलांची चाकून भोसकून हत्या केली. नंतर स्वतःही आत्महत्या केली . कांदिवली स्टेशन जवळ असलेल्या एका इमारतीत चार मृतदेह आढळून आले होते. छिन्नविछिन्न आणि जखमी अवस्थेतील हे मृतदेह होते. पोलिसांनी तपास केल्यानंतर प्रेमप्रकरणातून हे हत्याकांड झालं असल्याचं उघड झालंय. आत्महत्या करणारा ड्रायव्हर होता. यातील एक आई असून इतर दोघीजणी तिच्या मुली होत्या,
किरण दळवी, मुस्कान दळवी, भूमी दळवी, अशी हत्या करण्यात आलेल्या तिघींची नावं आहेत. शिवदयाळ सेन यानं या तिघांचा आधी खून केला आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केली. धारदार शस्त्राने वार करुन शिवदयाळ सेन याने तिघींनी संपवलंय. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
शिवदयाळ सेनचे प्रेमसंबंध होते. ड्रायव्हरसोबतच्या प्रेमसंबंधाची माहितीत कुटुंबाला कळली. त्यातून सतत खटके उडत होते. अखेर या वादाला कंटाळून ड्रायव्हरने तिघींची हत्या केली, आणि नंतर गळफास घेतला. पोलिसांना सुसाईड नोटही सापडली. एक धारदार शस्त्रही पोलिसांनी मृतदेह साडलेल्या ठिकाणावरुन जप्त केलंय.
या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात खळबळ माजली होती. शताब्दी रुग्णालयाकडून आता या मृतदेहांचे पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट येण्याची पोलिसांना प्रतीक्षा आहे. त्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जातेय.