जळगाव ( प्रतिनिधी ) – नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष मनिषा पाटील यांनी नातीचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करत जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्दच्या अंगणवाडीतील विद्यार्थी – विद्यार्थिनींना दप्तर वाटप केले.
३० जून रोजी सहपरिवार आणि नातीच्या हस्ते दप्तरे वाटप केली. सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मनिषा पाटील यांनी या लहान लहान बालकांची गरज ओळखून मुलांना अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी म्हणून त्यांना दप्तर वाटप करण्याचे ठरविले आणि आदर्श निर्माण केला या साठी त्यांना पतीची मुलांची व सुनांची देखील साथ लाभली असे त्या म्हणाल्या
मी सर्वांनाच आवाहन करू इच्छिते की वाढदिवसा साठी वायफळ पैसा खर्च न करता तो पैसा ज्या गरीब मुलांना खरोखर शैक्षणिक साहित्याची गरज आहे त्यांच्यासाठी खर्च करावा. नातीचे वय वाढू लागले तसे त्यांनी दरमहा एक वृक्ष लावून जोपासले आज ती 1 वर्षाची होतांना त्यांनी पाच देशी वृक्षांचे वृक्षरोपण अंगणवाडी येथे केलें. मुलांना खाऊ वाटप करून नातीचा वाढदिवस साजरा केला.
यावेळी सरपंच सरला आहिरे , उपसरपंच बाळू चौरे , अंगणवाडी सेविका उज्वला चौरे , सुपर वायझर जया जाधव, छाया जाधव , मंगला माळी , सुशीला महाजन व पालक उपस्थित होते.