उपयुक्त माहितीसह, दिनदर्शीकेच्या सजावटीचे भाऊंनी केले कौतुक

जळगाव (प्रतिनिधी) – अगदी कमी कालावधीत वाचकांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण करणार्या साप्ताहिक केसरीराजन अत्यंत उपयुक्त माहिती, तिथी, आणि उत्कृष्ट सजावटीसह 2021 दिनदर्शीका प्रकाशीत केली आहे. या दिनदर्शीकेचे उद्योगपती तथा जैन इरिगेशनचे अध्यक्ष मा. श्री. अशोकभाऊ जैन यांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आले. यावेळी दिनदर्शीकेच्या सजावटीसह यात असलेल्या उपयुक्त माहितीचे अशोक भाऊंनी कौतुक केले.

या प्रकाश सोहळ्याप्रसंगी केसरीराजचे संपादक भगवान सोनार, कार्यकारी संपादक नरेश बागडे, शिरसोली प्रतिनिधी कुणाल बारी हे उपस्थित होते.

साप्ताहिक केसरीराज गेल्या. मागील चार वर्षांपासून उत्तोमोत्तम दिनदर्शीका प्रकाशीत करीत आहे. सर्वसामान्य वाचकांना भावेल अशा उत्कृष्ट सजावटीसह सर्व सण, तिथी यांच्या उपयुक्त माहिती या दिनदर्शीकेत समाविष्ट आहे. धडाकेबाज वृत्तांकनाच्या माध्यमातून वाचकांच्या मनात साप्ताहिक केसरीराज व केसरीराज ऑनलाइन पोर्टल ने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. उत्कृष्ट अशी दिनदर्शीका प्रकाशीत करण्याचा संकल्प साप्ताहिक केसरीराजने यंदाही मोठ्या उत्साहात साकारला आहे.







