जळगाव (प्रतिनिधी) – श्री. नाना शंकरशेठ यांना भारतरत्न मिळावा व श्री. संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी शासनाने शासन स्तरावर साजरी करण्याची मागणीसाठी महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव तर्फे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे कि,मुंबई शहराचे आद्यप्रवर्तक श्री. नाना शंकरशेठ यांनी इंग्रजांच्या काळी रेल्वे सुरु करण्याकरीता इंग्रजांची सर्वतोपरी मदत केली. व्ही.टी. स्टेशनची जागा ही नानांची वडिलोपार्जित जागा होती. ती जागा त्यांनी इंग्रज सरकारला मोफत दिली.
आपल्या मुंबई शहरातील समस्त जनतेचाअडाणीपणा दूर व्हावा व आपल्या गावाची प्रगती व्हावी यासाठी मुंबई विद्यापीठ, एलफिस्टन कॉलेज, मेडिकल कॉलेज, लॉ कॉलेज, जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई विद्यापीठ आणी महत्वाचे म्हणजे जवळ जवळ १८५३ साली पहिली मुलींची शाळा इत्यादीअनेक शैक्षणिक संस्था उभारल्या. मुंबईत अनेक रस्ते दवाखाने उभारले.

भारतात पहिली जहाज कंपनी देखील सुरु केली.मुंबई शहर घडविण्यात नाना शंकरशेठ यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचा या योगदानाबद्दल, त्यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल त्यांना भारतरत्नने सन्मानित करावे. अशी विनंती समस्त अखिल भारतीय सोनार समाज बांधवांच्या वतीने महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव, जिल्हा जळगाव यांनी केली आहे.

तसेच सोनार समाजाचे आराध्य दैवत “श्री. संत शिरोमणी नरहरी महाराज” हे भारतातील सर्व सोनार समाजाचे दैवत आहेत. विविध अठरापगड जाती जमातीच्या संतांनी एकत्र येवून वारकरी संप्रदाय वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यात “श्री. संत शिरोमणी नरहरी महाराज” यांचे मोलाचे योगदान होते. त्यांचे अनेक समाज प्रबोधनात्म्क अभंग प्रसिद्ध आहेत. त्यांना त्याकाळी सर्व संतांच्या वतीने सर्वश्रेष्ठ ‘शिरोमणी’ ही देखील पदवी बहाल करण्यात आली होती. अश्या महान संतांची शासन स्तरावर दखल घेणे कामी शासनाने त्यांची पुण्यतिथी शासन स्तरावर साजरी करावी. अशी विनंती देखील समस्त अखिल भारतीय सोनार समाज बांधवांच्या वतीने महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव, यांच्या वतीने करीत जिल्हाधिकारी यांना करण्यात आली.
निवेदन देतांना संजय विसपुते, संजय पगार, इच्छाराम दाभाडे, योगेश भामरे, बबलू बाविस्कर, दिपक जाधव, रत्नाकर दुसाने, सचिन सोनार, सुरेश सोनार, सुभाष सोनार, विशाल विसपुते, धनराज जाधव, श्याम भामरे, शरदचंद्र रणधीर, पंकज रणधीर, भगवान दुसाने, विनोद सोनार व इतर समाज बांधव उपस्थित होते.







