धुळे (प्रतिनिधी) – शहरात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना लोकशाही मार्गाने निवेदन देण्यास गेलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पाचोरा शहर व तालुका तर्फे तीव्र निषेध करण्यात आला.

कोरोना विषाणू (कोविड-१९) च्या प्रादुर्भाव व त्यामुळे निर्माण झालेल्या ताळेबंदीमुळे राज्यातील सर्व क्षेत्रावर दूरगामी परिणाम झाला आहे व त्याला शिक्षणक्षेत्र देखील अपवाद नाही मागील पाच महिन्याचा काळातील शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबतीत तहसीलदार यांच्याकडे मागण्या निवेदनाद्वारे मांडण्यात आल्या.
अश्या आहेत मागण्या –
१ कोरोना महामारीमुळे अंतिम वर्ष वगळता इतर सर्व वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या परंतु विद्यार्थ्यांकडून या सत्राच्या परीक्षा शुल्क घेण्यात आले आहे तरी विद्यार्थ्यांना या सत्राचे परीक्षा शुल्क परत करण्यात यावी.
२ शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ या वर्षाच्या शैक्षणिक शुल्कात ३०% कपात करण्यात यावी.
३ सरासरीच्या सूत्रामुळे चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेल्या निकालाचे पुनर्मुल्याकन करण्यात यावी.
४ नवीन शैक्षणिक प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांकडून एकूण शुल्काच्या जास्तीत जास्त १५% शुल्क घेऊन प्रवेश देण्यात यावा उर्वरित शैक्षणिक शुल्क चार टप्प्यात घेण्यात यावी.
स्वायत्त (खाजगी) विद्यापीठाची शैक्षणिक शुल्काचा नियंत्रणासाठी राज्यस्तरीय शुल्क नियंत्रण समिती गठित करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी तालुकाध्यक्ष मुकेश पाटील, शहरध्यक्ष समाधान पाटील, तालुका सरचिटणीस परेश पाटील, जीतु पाटील, शहर सरचिटणीस योगेश ठाकूर, कुमार खेडकर, उपाध्यक्ष राहुल गायकवाड, विरेंद्र चौधरी,नितेश पाटील,अनिल पाटील, प्रवीण पाटील, योगेश चौधरी, लकी पाटील, हिंमत पाटील ,रामा जठार, सचिन चौधरी, अवी पाटील, आकाश ठाकरे, अमोल नाथ, कुणाल मोरे, गिरीश बडगुजर, ओम जाधव, कुणाल बोराडे, उदय सूर्यवंशी विकी भोई हेमंत पाटील आदी उपस्थित होते.







