जळगांव ( प्रतिनिधी ) – चिन्या जगताप हत्याकांडाच्या गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपी कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाडच्या अटकेसाठी नाशिकच्या किशोर सुधारालयातील शिपाई अनिल बुरकूल यांनी जळगाव जिल्हा न्यायालयाकडे तक्रार दाखल केली आहे !
नाशिकच्या किशोर सुधारालयाचे प्राचार्य यांच्यामार्फत दाखल केलेल्या या तक्रारीत शिपाई अनिल बुरकूल यांनी म्हटले आहे की , जळगांव जिल्हा कारागृहातील चिन्या ऊर्फ रविंद्र जगताप या न्यायाधीन बंदी मृत्यु प्रकरणातील मुख्य फरार आरोपी तत्कालीन अधिक्षक पेट्रस गायकवाड याचेवर अटकेची कारवाई व्हावी. न्यायाधीन बंदी चिन्या ऊर्फ रविंद्र जगताप याचा अधिक्षक पेट्रस गायकवाड यांनी केलल्या अमाणुष मारहाणीत झालेल्या मृत्यु प्रकरणात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हा पेठ पोलीस स्टेशन जळगांव येथे गुन्हा 30 नोव्हेंबर 2021 रोजी दाखल झालेला आहे. या गुन्हयातील आरोपी फरार आहेत. मुख्य आरोपी पेट्रस गायाकवाड हा वेगवेगळया गुंड प्रवृतीच्या मध्यस्थांमार्फत माझेवर तसेच फिर्यादी महिला व सरकारी साक्षीदार रक्षक मनोज जाधव याचेवर केस मागे घेणे व जबाब बदलणेसाठी दबाव आणून थमक्या देत आहेत.
याबाबत संबधित पोलीस स्टेशन व पोलीस अधिक्षक, जळगांव यांचेकडे वेळोवेळी फिर्यादी, साक्षीदार व याचिकाकर्ता यांनी रितसर तक्रारी अर्ज केले गेले आहेत. मुख्य फरार आरोपी तत्कालीन जेल अधिक्षक पेट्रस गायाकवाड यास अहमदनगर जिल्हा कारागृह येथे नेमणुक देण्यात आलेली असुन, खुनाचा गुन्हा दाखल असतांनाही आजपर्यंत संशयास्पदरित्या जळगाव जिल्हा पेठ पोलीस स्टेशन यांचेकडुन अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही. फिर्यादी महिला मिना जगताप तसेच साक्षीदार कारागृह रक्षक मनोज जाधव यांनी संबधित पोलीस स्टेशन येथे वेळोवेळी या गुन्हयातील आरोपींवर अटकेची कारवाई होणेबाबत तक्रारी देवून तसेच प्रत्यक्ष भेटून विनंती केलेलीआहे. तरी देखील संबधित पोलीस स्टेशन कडुन आरोपींना पाठीशी घालण्यात येवून अटकपुर्व जामीन मिळवून देण्यासाठी मदत केली जात आहे. या गुन्हयातील मोकाट असलेले आरोपी पेट्रस गायकवाड व इतर यांचेबर तात्काळ अटकेची कारवाई होणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती या तक्रारीत जिल्हा न्यायालयाला करण्यात आली आहे.