जळगाव ( प्रतिनिधी ) – घर बांधण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामेश्वर कॉलनीतील माहेर असलेल्या विवाहिता माधुरी धनगर (वय-२१) यांचा विवाह कोल्ह ( ता.पाचोरा ) येथील पवन धनगर यांच्याशी मार्च २०२१ मध्ये झाला . लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले गेले, नंतर मात्र पती पवन धनगर याने विवाहितेला टोमणे मारणे सुरु केले. त्यानंतर घराच्या बांधकामासाठी माहेरहून ३ लाख रुपये आणावे, यासाठी तगादा लावला. परंतु विवाहितेच्या आई-वडिलांचे परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ३ लाख रुपये देऊ शकले नाही. या कारणावरून पती पवन धनगर याने शिवीगाळ करून मारहाण केली पैसे आणले नाही म्हणून सासू आणि सासरे यांनी विवाहितेला घरातून हाकलून दिले.
दरम्यान त्या माहेरी निघून आल्या. २९ एप्रिलरोजी विवाहितेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती पवन धनगर, सासु कल्पना धनगर, सासरे बाबूलाल धनगर ( सर्व रा. कोल्ह ता. पाचोरा ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो हे कॉ महेंद्रसिंग पाटील करीत आहेत .