नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात कोरोना विषाणूने अक्षरशः विस्फोट केला असून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत देखील कोरोना मुळे अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत कडक लॉकडाऊन केला असतानाच आता खुद्द आपच्या आमदारानेच दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. आपचे आमदार शोएब इक्बाल यांनी ही मागणी केली आहे.
‘दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांना ना औषध मिळत आहे, ना हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन. लोकांचे कोणीच ऐकत नाहीय. मला दु:ख होतेय की आम्ही कोणाचीच मदद करू शकत नाही आहोत. मी सहा वेळा आमदार राहिलो आहे. मात्र, कोणही ऐकत नाहीय. त्यामुळे उच्च न्यायालयाने इथे राष्ट्रपती राजवट लावावी, नाहीतर इथे रस्त्यांवर मृतदेह पडलेले दिसतील,’ असे शोएब इक्बाल म्हटले आहेत.







