अमळनेर(प्रतिनिधी) – आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष श्रीनाथ रवींद्र पाटील यांच्यातर्फे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्रावर झालेला परिणाम,ऑनलाइन अभ्यास,शिक्षण बंद की सुरू अशा अनेक प्रश्नांवर आधारित चर्चासत्र घेण्यात आले.यासाठी विनोद जाधव (संचालक जाधव क्लासेस) यांनी फेकबुक लाइव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यात त्यांनी प्रामुख्याने शासन प्रशासन हे मायबाप असते आई-वडिलां प्रमाणेच मुलांची अर्थात विद्यार्थ्यांचे आरोग्य व जीवाची काळजी असते म्हणून परीक्षा रद्द झाल्यात हा निर्णय योग्यच घेण्यात आला.सद्य परिस्थिती पाहता ही शैक्षणिक वर्ष ऑनलाईनच चालू शकते, सध्यातरी सर्वसामान्य साठी सुद्धा मोबाईल शिवाय पर्याय नाही,शासनाने ऑफलाइन शाळा आणि क्लासेस थांबवले मात्र अभ्यास नाही,
लॉक डाऊन मुळे शाळा कॉलेज नाही म्हणून अभ्यासाला, स्वयंअध्ययन भरपूर वेळ जास्तीत जास्त विषयाचा सखोल अभ्यास करता येऊ शकतो.
श्रीमंतांचे शिक्षण सुरू राहणार परंतु मोबाईल अभावी गरीब मागे पडता कामा नये म्हणून आपल्याकडील जास्तीचा असलेला मोबाईल गरिबाला द्यावा असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले.
रतनजी टाटा ऑक्सिजन उपलब्ध करून देतात अंबानीच्या माध्यमातून गरीब व गरजू मुलांना शिक्षणासाठी नेट्स व मोबाईल द्यावेत.
मी स्वतः वीस वर्षापासून ज्या विद्यार्थ्याला वडील नाहीत ज्या माऊलीच्या कपाळावर कुंकू नाही धूनभांडी करतात अशा विद्यार्थ्यांकडून फी घेतच नाही असे जाधव सर यांनी संगीतले.तसेच त्यांनी यावेळी ज्या विद्यार्थ्याला आई-वडील वा पूर्ण कुटुंब कोरोनात मरण पावले असतील किंवा आधारच हरपला असेल अशा विद्यार्थ्यांना मी दत्तक घेणार असून इतर विषयां सह इंग्रजी विषयाची ही फी लागणार नाही अशा दानशूर भावनेने त्यांनी सांगता केली.
व्यख्यानाला मोठ्या प्रमाणात शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी उपस्थित होते.विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीनाथ पाटील यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले होते.







