भडगाव तालुक्यातील घटना, पोक्सो कायद्यांर्गत गुन्हा दाखल
जळगाव ( प्रतिनिधी ) – भडगाव तालुक्यात तीन वर्षाच्या चिमुकलीवर दहावीच्या विद्यार्थ्यांने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी १७ वर्षीय मुलावर पोक्सो कायद्यांर्गत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भडगाव तालुक्यातील एका गावात ३ वर्षीय चिमुकली परिवारासह वास्तव्याला आहे. गावातील राहणाऱ्या १७ वर्षीय मुलाने पिडीत मुलीला खेळण्याच्या बहाण्याने घरी नेत लैंगिक अत्याचार केला. पिडीत मुलगी घरी रडत आल्यानंतर तिने आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर पिडीत मुलीच्या आईने भडगाव पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी विधी संघर्षीत मुलावर गुन्हा दाखल केला. संदर्भात पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे हे करत आहेत.