हायकोर्टाने नेमलेल्या समितीच्या अहवालांनंतरच विलीनीकरणाचा निर्णय ; संप मिटणार?
मुंबई ( प्रतिनिधी ) – ३ वर्गांत वर्गीकरण करून एस टी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ठोक वाढ करण्याचा निर्णय आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केला हायकोर्टाने नेमलेल्या समितीच्या अहवालांनंतरच विलीनीकरणाचा निर्णय होईल असेही ते म्हणाले आता हा संप मिटणार की सुरूच राहणार हा खरा प्रश्न आहे.
परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिलेल्या माहितीनुसार , या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडेभत्ता आणि महागाईभत्ता दिला जाणार आहे . ज्या कर्मचाऱ्यांची सेवा १ ते १० वर्षे झाली असेल त्यांच्या मूळ वेतनात ठोक ५ हजार वाढ जाहीर झाली आहे . ज्यांना 12,500 रुपये पगार आहे, त्यांना आता 17,500 रुपये पगार मिळणार आहे.१० ते २० वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना ४ हजार रुपये वेतनवाढ मिळणार आहे त्यांना आता २८ हजार ८०० रुपये वेतन मिळू शकेल . २० वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा केलेल्या लोकांना आता अडीच हजार वेतनवाढ मूळ वेतनात झाली आहे त्यांना आता ४१ हजार ४०० रुपये वेतन मिळणार आहे ही जवळपास ४१ टक्के वेतनवाढ आहे . नोव्हेंबर महिन्याच्या पगारापासूनच ही पगारवाढ लागू होणार आहे टाटा दर महिन्याच्या १० तारखेच्या आत या कर्मचाऱ्यांचे पगार होतील अशी हमी राज्य सरकारने घेतली आहे राज्य सरकारने या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन योजना जाहीर केली आहे एस टी ला जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या वाहक आणि चालकांना प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे . सेवेच्या जाचक अटींचा त्रास निरपराध लोकांना होऊ नये अशी हमीही राज्य सरकारने घेतली आहे . या संपकाळात निलंबित करण्यात आलेले कर्मचारी आता कामावर हजर झाले तर त्यांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णयही परिवहनमंत्र्यांनी जाहीर केला