चाळीसगांव (विशेष प्रतिनिधी) – चाळीसगांव शहर आणि तालुक्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव हा वाढतच असतांना आता तर कोरोनाचा प्रादुर्भाव हा शासकिय कार्यालयातील कर्मचार्यांनाही बाधीत करणारा ठरत असल्याने पॉझीटिव्ह कर्मचारी उपचारार्थ क्वॉरंटाईन होत असतांना कार्यालयातील इतर कर्मचार्यांनाही खबरदारी म्हणून होमक्वॉरंटाईन करुन घेण्याची वेळ असल्याचा परीणाम शहरातील काही शासकिय कार्यालयांमध्ये दिसून येत आहे.

यापूर्वी शहरातील स्टेट बँकेसह अन्य बँकात कर्मचारी कोरोना पॉझीटिव्ह आढळून आले. खबरदारी म्हणून काही दिवस सदरील बँका बंद ठेवण्याचा निर्णय बँक प्रशासनाने घेतला होता. बँका आणि शासकिय कार्यालयात दरदिवसाला होणारी गर्दी आणि या गर्दीत कामकाज करणारे कर्मचारी अशा परीस्थितीत आता शासकिय कार्यालयातील कर्मचारी कोरोना बाधीत होण्याचे प्रमाण वाढत असतांना याआधी ग्रामीण भागातील जनतेशी संबंधीत शहर पोलीस स्टेशन त्यानंतर नगरपालीका शहर तलाठी कार्यालयातील एक तलाठी आणि आता तहसील कार्यालयातील कर्मचारी अधिकारी देखील कोरोना पॉझीटिव्ह आढळून येत असल्याने एकूणच शासकिय कर्मचार्यांत वाढता कोरोना टाळण्यासाठी आता शासकिय कार्यालयात कर्मचार्यांना येण्यास रोखण्यापासून पर्याय आखले गेले आहेत. नागरीकांनीही या पर्यायाचा अवलंब करण्यासाठी संबंधीत प्रशासन आवाहन करीत आहे.







