चाळीसगांव (विशेष प्रतिनिधी) – चाळीसगांव शहरातील रामराव फकीरराव मार्केटमधून दुकानासमोर लावलेली 407 टॅम्पो वाहन अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना दिनांक 30 ऑगस्टच्या रात्री घडली.
रा. फ. मार्केटमधील किराणा भुसार व्यापारी धोंडू बाबुलाल वाणी यांच्या दुकानाबाहेर लावलेली त्यांच्या मालकीचे (एम. एच. 19-एस. 5577) हे 407 टॅम्पो वाहन अज्ञात चोरट्याने दि. 30 च्या रात्री चोरुन नेले. या प्रकरणी पोलीसांत काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.