जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जळगाव शहरातील व्यापारी संकुलामधील स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात
यावी नाहीतर मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयुक्तांना निवेदनाद्वारे देण्यात
आला आहे.
जळगाव शहरातील व्यापारी संकुलामधील स्वच्छतागृहांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी. या स्वच्छतागृहांमध्ये
काही दुकानदारांनी आपली दुकाने थाटली आहेत. अशी दुकाने तात्काळ हटवण्यात यावी. स्वच्छतागृहासाठी जागा देण्यात यावी
आदी मागण्यांचे निवेदन आयुक्त सतीश कुलकर्णी यांना देण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम, गोविंद जाधव, गणेश नेरकर, विशाल कुमावत, कृष्णा लोंढे, कतिक
हातागडे, समाधान चांदेकर आदींची यावेळी उपस्थिती होती.