जामनेर (प्रतिनिधी) – संपूर्ण विश्वामध्ये करोनाची भयावह परिस्थिती निर्माण झाली असताना आपल्या निडर बाण्यासाठी प्रसिद्ध असलेले जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांनी प्रत्यक्ष कोविड सेन्टरमध्ये जाऊन करोना रुग्णांशी संपर्क साधला.
आमदार गिरीश महाजन यांच्या देखरेखीखाली जामनेरच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांची जेवण चहा नाष्टा पाण्याची व्यवस्था होत आहे आज जिल्हा रुग्णालयाच्या वतीने कोविड सेंन्टर मध्ये करोना रुग्णांशी संवाद साधला या विषयावर कार्यक्रम होता, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आमदार महाजन हे उपस्थित होते तहसीलदार अरूण शेवाळे. अरविंद देशमुख. अक्षय जाधव. आदीनी कार्यक्रमास उपस्थिती दिली. यावेळी जळगावचे मानसिक आरोग्य अभियानाचे समुपदेशक प्रमुख दौलत निमसे .ज्योती पाटील .यांनी कोरना रुग्णांची कौन्सिलिंग करून करोना बाबतची भीती दूर केली.