पाचोरा ( प्रतिनिधी) – येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे संचालक डॉ. भूषण दादा मगर यांच्या प्रयत्नांमुळे आणखी एका पत्रकारास जीवनदान मिळाले.
कोरोना काळात सतत धावपळीच्या जीवनात आपली स्वतःची व आपल्या परिवाराची पर्वा न करता पत्रकार आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत कोरोना या संसर्गजन्य आजारापासून मंत्री पासून तर सामान्य माणूस ही पॉझीटीव्ह येत आहे. थोडाही निष्काळजी पणा दाखवला तर या आजारा पासून जगभरात कोणीच सुटलेला नाही.
मागील दोन वर्षांपूर्वी मिलींद सोनवणे यांचा अपघात झाला होता परंतु गंभीर जखमी झाल्यामुळे सुदैवाने त्यांचा रेलीगिअर कंपनीचा मेडिक्लम असल्याने डॉ. भुषणदादांनी त्यांना जळगाव येथे तातडीने उपचारासाठी स्वतः नेले व केशलेश सुविधेचा लाभ मिळऊन दिला होता.परंतु त्यावेळी सुध्दा डॉ. भुषण मगर यांनी एका पत्रकाराचा जीव वाचवल्याची आठवण आजही पंचक्रोशीत आहे.
सद्यस्थितीत कोरोना ( कोविड १९ ) या संसर्गजन्य आजारामुळे संपूर्ण देशात अहंकार माजला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाचोरा येथील दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार प्रशांत येवले यांना कोरोनाची लागण झाल्याने घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची व तब्येत अत्यंत गंभीर होती . यावेळी आमदार किशोरआप्पा, त्यांचे स्विय सहाय्यक राजु पाटीलसह संपुर्ण मित्र परिवारासह सर्व पत्रकार बांधवांनी मदत केली यासाठी महत्वपुर्ण भुमीका पत्रकार व ध्येय अँकेडमीचे संचालक संदीप महाजन यांनी महत्वपुर्ण भुमीका निभावली तर डॉ. भूषणदादा मगर यांनी पाचोरा येथे त्यांच्या कोवीड सेंटरला कोणताही मोबदला न घेता पत्रकार प्रशांत येवले यांच्यावर औषधोपचार केले.
पत्रकार येवले यांच्यावर कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता डॉ. भूषण मगर यांनी जळगाव येथे तातडीने हलवण्याचा सल्ला दिला तेथील खाजगी हॉस्पीटल येथे उपचारासाठी देखील मदत केली.व उपचारा नंतर प्रशांत येवले घरी सुखरूप आल्यानंतर.
श्री.येवले यांचा रिलगेअर कंपनीचा मेडिक्लम अवघ्या सहा दिवसात दोन लाखाचा पास झाला. सदरचा चेक आल्यानंतर डॉ. मगर यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी डॉ भुषणदादा मगर यांचा पत्रकार प्रशांत येवले यांनी सहपत्नी सत्कार करून. आशीर्वाद घेतला.
यावेळी प्रा. सी. एन. चौधरी,संदीप महाजन , लक्ष्मण सुर्यवंशी, सौ. शितल महाजन मिलिंद सोनवणे,सौ. कविता सोनवणे,धनराज पाटील, गणेश शिंदे , मनोज बडगुजर , केदार पाटील आदी उपस्थित होते.