मुंबई (वृत्तसंस्था) – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आरेतील वृक्षतोडीवरून मोठे आंदोलन झाले होते. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे संबंधी मोठा निर्णय घेतला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची 600 एकर जागा वनासाठी राखीव ठेऊन येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आनंद व्यक्त केला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले कि, मित्रहो, आम्ही दिलेला शब्द जपला. आरेचे जंगल वाचावं ह्यासाठी माझ्यासहित अनेक जणांनी आंदोलने केली तुरुंगात गेले. पण तत्कालीन सरकार बधले नाही. परंतु आपले सरकार आल्याबरोबर हे वन संरक्षित करण्याचा निर्णय घेतला गेला. आपणा सर्वांचे अभिनंदन, असे त्यांनी म्हंटले आहे. तसेच संघर्षाचा विजय असो असा हॅशटॅगही दिला आहे.







