जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील पोलन पेठ येथील रिक्षाचालकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदकिशोर श्रीकृष्ण चव्हाण (वय -६४, रा. पोलनपेठ सुभाष डेअरीजवळ जळगाव) हे रिक्षाचालक आहेत. त्यांच्याकडे ( एमएच १९ बीव्ही ११९८) क्रमांकाची ऍक्टिवा मोपेड दुचाकी आहे. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ८ वाजेच्या समोर दरम्यान त्यांच्या घरासमोर त्यांनी दुचाकी पार्क करून लावली होती. अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात नंदकिशोर चव्हाण यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक योगेश पाटील करीत आहे.