जळगाव ( प्रतिनिधी ) – जोशीपेठेतील भोईगल्लीतून मासे विक्रेत्याची ३५ हजार रूपये किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. चोरी करतांना चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमेश भिकन भोई (वय-३१) हे भोई गल्ली, जोशीपेठ येथे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मासे विक्री करून उदरनिर्वाह करतो. उमेश राहत असलेल्या गल्लीत रस्त्यांची रूंदी कमी असल्याने जवळच असलेल्या हनुमान मंदीराजवळील रस्त्यावर मोटारसायकल उभी करत असतात. ३१ मे रोजी रात्री मोटारसायकल (एमएच १९ डीएस १७४९) हनुमान मंदीराजवळ लावली होती. अज्ञात चोरट्याने सकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास पार्कींगच्या ठिकाणाहून मोटारसायकल चोरून नेली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. २ जून रोजी दुपारी उमेश भोई यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना किरण वानखेडे करीत आहेत.