जळगाव ( प्रतिनिधी ) – गणेश कॉलनीजवळील भाग्योदय कॉलनीत बंद घर फोडून रोख रकमेसह चांदीच्या मुर्त्यांची चोरी झाल्या आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
नानासाहेब पुंडलिक ठाकरे (वय-६८) हे भाग्योदय कॉलनीत कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. नानासाहेब ठाकरे यांचे घर १ जूनला सकाळी ते २ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान बंद होते. अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून कपाटातून ५ हजाराची रोकड आणि २ हजार रूपये किंमतीच्या चांदीच्या दोन मुर्त्या चोरून नेल्या २ जून रोजी नानासाहेब ठाकरे घरी आल्यावर चोरी झाल्याचे समोर आले. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. २ जून रोजी रात्री जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोहेकॉ तुषार जावरे करीत आहेत.