जळगाव ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र सुवर्णकार सेनेच्या जळगाव जिल्हा शाखा कार्यकारणीची बैठक अध्यक्ष संजय विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली.
या बैठकीमध्ये प्रामुख्याने पुढील निर्णय घेण्यात आले – लवकरच ऋणानुबंध वधू-वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे , समाजातील गुणवंत विद्यार्धी व विद्यार्थिनी यांच्या सत्काराचे आयोजन करावे. यासाठी प्रकल्प प्रमुख म्हणून नितीन गंगापूरकर यांची एकमताने निवड करण्यात आली. जळगाव शहरातील मंगल कार्यालयबाबत चर्चा करून लवकर मार्ग काढण्याकरिता सद्यस्थितीत असलेली मंगल कार्यालयाची कार्यकारणी व समाज बधवांशी चर्चा करून मार्ग काढण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला. सामाजिक कार्यात महिलांचा सहभाग वाढावा या उद्देशाने शहरात सामाजिक कार्यक्रम सुवर्णकार समाज महिला मंडळ या संघटनेसोबत राबवावे.
या वेळी उपाध्यक्ष विजय वानखेडे, अरुण वडनेरे, सचिव संजय पगार, प्रसिद्धीप्रमुख प्रशांत विसपुते, रत्नाकर दुसाने, धनराज जाधव, सुरेश सोनार, उत्तमराव नेरकर, इच्छाराम दाभाडे, राजेंद्र दुसाने, दीपक जाधव , शशिकांत जाधव , नितीन गंगापूरकर, मनोज सोनार आदी उपस्थित होते.