भुसावळ ( प्रतिनिधी ) – भुसावळ येथे आजीच्या दशक्रीया विधीसाठी आलेल्या तरूणाला घरासमोरून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्यूत तारेला हाताचा धक्का लागल्याने गंभीर जखमी होवून त्याचा उजवा हात कायमचा निकामी झाला आहे. महाविरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना देण्यात आले
भुसावळ येथे केशव भाईदास पाटील हे कुटुंबियांसह पुण्यात वास्तव्याला आहे. खासगी व्यवसाय करून ते उदरनिर्वाह करतात. त्याची आई सुमन पाटील यांचे २१ जून रोजी निधन झाले होते. त्यामुळे केशव पाटील हे पत्नीसह भुसावळ येथे आले होते. ३० जून रोजी त्यांच्या आईचा दशक्रिया विधी असल्याने केशव पाटील, त्यांची पत्नी आणि मुलगा अथर्व पाटील हे भुसावळ येथे थांबून होते. २९ जून रोजी दुपारी त्यांनी पाण्याच्या टँकर बोलावला होता. त्यावेळी अर्थव हा गच्चीवरून खाली डोकावून पाहत असतांना घराच्या समोरून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्यूत तारेला त्याच्या हाताचा धक्का लागला. त्यावेळी केशव पाटील त्याच्या मागेच होते. विजेचा जोराचा धक्का लागताच केशव पाटील यांनी कॉटवरील उशीच्या सहाय्याने अथर्वला पुश केले त्यामुळे अथर्व बाजूला पडला व केशव हे विरूध्द दिशने पडले. त्यामुळे अथर्व बचावला
. दरम्यान या घटनेत अथर्वचा उजवा हात पुर्णपणे जळाल्याने निकामी झाला त्याला जळगाव येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मुलाच्या हाताचे नुकसान झाले असल्याचा आरोप केशव पाटील यांनी केला आहे. महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना देण्यात आले आहे. मुलाच्या नुकसानीची भरपाई महावितरण कंपनीने द्यावी अशी देखील मागणी केली आहे.