जामनेर (प्रतिनिधी) – जामनेर तालुक्यातील पाळधी येथे नववर्षानिमित्त राजगड हॉस्पिटल येथे दि. 1 जानेवारी रोजी 2021 शुक्रवार रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. शिबिरात १८६ रुग्णांची तपासणी ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट (नेत्रतज्ज्ञ) डॉ. आम्रपाली काकलिया ह्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. शिबिरात ४८ रुग्ण मोतीबिंदू (कॅटरॅक्ट)चे, नासूरचा १ रुग्ण, १२ रुग्ण काळ्या बुबुळांवरील वाढलेली कातडी(टेरिजियम)चे स्क्रिनिंग मध्ये आढळले असून ६ रुग्णांना फेर तपासणी साठी तर २० रुग्णांची कॅमेराद्वारे तपासणी करण्यासाठी सागर नेत्रालय जळगाव येथे संदर्भित करण्यात आले आहेत. शिबिर यशस्वी करण्यासाठी हर्षल पाटील, अजय बडगुजर, निलू आबा, सागर शिंपी, मयूर परदेशी, दिनेश पाटील तसेच शिवसन्मान प्रतिष्ठान कार्यरत होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुकेश जाधव ह्यांनी केली. डॉ प्रमोद पाटील आणि डॉ प्रियंका पाटील ह्यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन डॉ. वैभव पाटील ह्यांनी मानले.








