जामनेर (प्रतिनिधी ) – आज प.पु.शाम चैतन्यजी महाराज व माजी मंत्री आ. गिरिषभाऊ महाजन यांच्या उपस्थिती श्री राम मंदिर निधी समर्पण कार्यालयाचे जामनेरला उदघाटन करण्यात आले. त्यावेळी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर निधी अभियानास जामनेर मधील हनुमान मंदिर येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी जामनेर शहरातील असंख्य रामभक्त मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यालय उदघाटन ठिकाणी प.पु.शाम चैतन्यजी महाराज मा.मंत्री गिरिषभाऊ महाजन दादा मोरे, डॉ.सचिन पाचंगे, अँड. शिवाजी नाना सोनार, डॉ.मनोज विसपुते व शहरातील बरेच कारसेवक रामभक्त यांची मोठया संख्येने हजर होते. या वेळी गिरीश महाजन यांनी 1992 च्या कारसेवेतील आठवणी सांगितल्या. त्यात त्यांच्या बरोबर घडलेला अनेक प्रसंग सांगत त्यांच्या भावना त्यांनी उपस्थित राम भक्त यांच्या समोर मांडल्या की, त्या वेळी त्यांनी किती संघर्ष करावा लागला. त्यांना जेलमध्ये काय टाकण्यात आले ,असे बरेच काही प्रसंग त्यांनी या ठिकाणी सांगितले .मा.कोर्ट यांनी जो निर्णय दिला त्या निर्णयाचे सर्व राम भक्तांनी आभार मानले व मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर हे शक्य झाले असे जाहीर आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.









