अमळनेर (प्रतिनिधी) – आजच्या दिवशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अतिशय आनंदाच्या व उत्साहाच्या वातावरणात त्यांना आदर आदरांजली अर्पण करून साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक जे. एस. देवरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आणि दीपप्रज्वलन करून केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक शाळेच्या पर्यवेक्षिका एम. एस. बारी यांनी केले. त्यांनी आपल्या प्रकट मनोगत भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील असे पूर्ण व महत्त्वपूर्ण प्रसंगाचे सुंदर अमोघ भाषेत वर्णन केले. त्यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणातून शाळेचे मुख्याध्यापक जे. एस. देवरे यांनी अतिशय सुंदर जीवनात आपणास मार्गदर्शक ठरतील व प्रेरणादायी प्रसंग सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र आशयपूर्ण व यथार्थ पूर्ण शब्दात मांडले. शाळेतील सर्व शिक्षक उपरोक्त कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती दाखवून सदर कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या संपन्न केला. सदर कार्यक्रमासाठी अनमोल मार्गदर्शन व सहकार्य शाळेचे चेअरमन डॉ. संदेश बी. गुजराथी, मुख्याध्यापक जे. एस. देवरे व समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे लाभले.








