चाळीसगाव (प्रतिनिधी) – हुतात्मा वीर भाई कोतवाल चौक भडगाव रोड चाळीसगाव येथे शहीद हुतात्मा वीर भाई कोतवाल यांचे पुतळ्यास दि २ रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात येऊन त्यांना भावपुर्ण आदरांजली वाहण्यात आली.
या प्रसंगी उत्तर महाराष्ट्र नाभिक विभागीय महा मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब एकनाथ शिरसाठ, नाभिक महामंडळाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष रविंद्र नेरपगार, नाभिक कर्मचारी संघाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष मनोहरजी खोंडे, संजय सोनवणे, राजेंद्र ठाकरे , श्रीखंडे, नाभिक महामंडळ महाराष्ट्रचे सदस्य सुनील बोरसे उपस्थित होते.
माजी सरपंच किसनराव जोर्वेकर, नानासाहेब शिरसाठ, बंटी नेरपगार, मनोहरजी खोंडे यांनी आपले विचार व्यक्त केले व जोर्वेकर यांनी नाभिक समाजाचे विकासासाठी व हुतात्मा स्मारकासाठी सदैव प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले.
या वेळी नाभिक समाजातील अनेक समाज बांधव उपस्थित होते. आमदार मंगेश चव्हाण, विनायक वाघ, नगरसेवक नितीन पाटील, महेंद्र पाटील, संजय पाटील, रमेश चौधरी, सदानंद चौधरी, बापू पवार, अल्लाउद्दीन शेख, माजी नगरसेवक संजय घोडे यांनी माल्यार्पण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण नेरपगार यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. राजेंद्र बहाळकर यांनी केले.








