जामनेर (प्रतिनिधी) – जामनेर तालुक्यातील वडाळी ग्रामपंचायत मध्ये हरी नगर येथील वार्ड क्रमांक एक मधून महिला जनरल जागेसाठी सौ. सगुना शिवदास जाधव यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे त्यांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले आहे. सगुना जाधव यांचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील, शिवसेना माजी शहर प्रमुख पहुर सुकलाल बारी, शहर प्रमुख संजय तायडे, शेंदुर्णी शहर प्रमुख विलास पाटील, तालुका शिवसेना प्रवक्ता गणेश पांढरे, रवींद्र पांढरे, शिवसेना उपतालुका प्रमुख अशोक जाधव, शाखाप्रमुख सुधाकर शिंगारे आदींनी अभिनंदन केले आहे.








