वर्धा (वृत्तसंस्था) – आज सकाळी वर्धा शहरानजीक एक मोठी दुर्घटना घडली आहे. भूगाव येथील उत्तम गाल्व्हा या नामांकित स्टील कंपनीत सकाळच्या सुमारास भीषण स्फोट झाला असून यामध्ये मोठी हानी झाली आहे.

आज (दि. 3) सकाळी कंपनीत काम करत असताना अचानक हा स्फोट झाला. या स्फोटात तब्ब्ल 25 कामगार गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने सावंगीच्या दत्ता मेघे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये जखमींची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सध्या घटनास्थळी सावंगी ठाणेदार रेवचंद शिंगांनजुडे आपल्या चमुसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. फर्निशचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.







