जळगाव ( प्रतिनिधी ) – दारू पिण्यासाठी उसनवार ५०० रुपये न दिल्याच्या रागातून तरूणाला तीन जणांनी लाथाबुक्क्यांसह फायटरने बेदम मारहाण केल्याची घटना इच्छादेवी चौकात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
तांबापुरा परिसरातील बिस्मिल्ला चौक येथे इम्रान रफीक काकर ( वय ३५ ) हा तरुण राहतो. मजुरी करून उदरनिर्वाह भागवतो. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास इच्छादेवी चौकात इम्रान याला आबा ऊर्फ बकरेवाला व इतर दोन जणांनी दारू पिण्यासाठी ५०० रुपये ऊसनवार मागितले. इम्रान याने पैसे देण्यास नकार दिल्याने फायटर इम्रान याच्या डोक्यात मारले तर इतर दोन जणांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत इम्रान जखमी झाला आहे. याप्रकरणी इम्रानने दिलेल्या तक्रारीवरून आबा ऊर्फ बकरेवाला व त्याच्यासोबत ईतर दोन जण तिघे रा. तांबापुरा अशा तीन जणांविरुध्द रात्री एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील करीत आहेत.