एरंडोल / पारोळा ( प्रतिनिधी ) – एरंडोल , पारोळ्यात युवासेनेकडून वाढत्या महागाईच्या विरोधात मोदींचा उपरोधिक अभिनंदनाने निषेध करण्यात आला
देशात रोजच्या पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, डाळीसह इतर संसारोपयोगी साधनांच्या वाढत्या दरामुळे शेतकरी, सामान्य नागरिक अक्षरशः होरपळुन गेला आहे. रोजच्या वाढत्या महागाईमुळे जनता चिंतेत आहे. महागाईला आवर घालण्यासाठी केंद्र शासनातर्फे कुठलेही ठोस पाऊल उचलले जात नाहीये. त्यामुळे शेतकरी, सामान्य जनता आर्थिक संकटात असुन जनतेच्या चिंतेत अधिकाधिक भर पडत आहे. रोजगारासंदर्भात कुठलेच ठोस निर्णय घेतले जात नसतांना वाढत्या महागाईमुळे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालेले आहे.
या वाढत्या महागाई विरोधात पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांच्या नेतृत्वात पारोळा व एरंडोल येथील युवासेनेतर्फे केंद्र शासनाचे उपरोधिक अभिनंदन करत जाहीर निषेध करण्यात आला. याप्रसंगी पारोळा व एरंडोल शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह नागरीक उपस्थित होते.