जळगाव ( प्रतिनिधी ) – मेहरुण परिसरातील रामनगर येथे काहीही कारण नसतांना दारुच्या नशेत महिलांना शिवीगाळ करत दमदाटी करणाऱ्या एकाच कुटुंबातील चार जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
रामनगर येथील रहिवासी आफरिन जमीर शेख (वय ३०) या शनिवारी रात्री घरासमोर असतांना त्यांना एकाने दारुच्या नशेत शिवीगाळ करत वाद घातला. संबंधिताच्या कुटुंबातील दोन महिला व आणखी एका जणानेही आफरीन शेख यांना शिवीगाळ करत दमदाटी केली. आफरीन यांची शेजारी असलेल्या सुरेखा रविंद्र सोनवणे भांडण सोडविण्यासाठी आले असता. त्यांनाही संबंधितांनी शिवीगाळ करत दमदाटी दिली. आफरीन शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सुरेश अशोक सोनार व इतर तीन जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील हे करीत आहेत.