जामनेर (प्रतिनिधी) – फर्दापूर ते जळगाव या महामार्गाचे काम 70 टक्के पूर्ण झाले असून एक साईट वाहतूक सुरू आहे.

जवळपास एक वर्षापासून स्पाईरो कंपनीने या चौपदरी रस्त्याचे काम 70 टक्के पूर्ण केलेले आहे. यामुळे वाहन चालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. सदर काम उत्कृष्ट दर्जाचे असून प्रगतीपथावर आहे काही पुलांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे व काही जोमाने सुरू आहे काम लवकर पूर्ण झाले असते परंतु कोरोना महामारी मुळे व लाँकडाऊन असल्यामुळे काही दिवस काम बंद होते. एवढे असताना सुद्धा स्पाईरो कंपनीचे सर्व अधिकारी यांनी कामाला योग्य दिशा देत रस्त्याचे काम जवळपास 70 टक्के पूर्ण केलेले आहे.
स्थापत्य दृष्ट्या अत्यंत जिकिरीची कामे पूर्ण करण्याचे या अभियंत्यांनी स्वीकारलेले आव्हान आणि कामाच्या वेगाची रस्ते बांधणी क्षेत्रातील जाणकारांनी प्रशंसा केली आहे. आता तर थेट औरंगाबाद पर्यंतचे काम अशाच निपुण अभियंत्यांकडून पूर्ण करून घ्यावे अशा सूचना सरकारला केल्या जात आहेत.







