नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे (एमएचआरडी) नामकरण करण्यात आले आहे. एमएचआरडीचे नाव बदलून शैक्षणिक मंत्रालय करण्यात आले आहे. यासोबतच नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे.

दरम्यान, आज दुपारी चार वाजता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल हे एकत्रित पत्रकार परिषद घेऊन या धोरणाविषयी माहिती देणार आहेत.







