चुंचाळे ता यावल (प्रतिनिधी) – येथिल श्री समर्थ रघुनाथबाबा माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल हा ९३ टक्के लागला आहे.यावर्षी विद्यालयातुन एकुण ४३ विद्यार्थांनी परीक्षा दिली होती त्यातुन ४० जण पास झाले असुन इतर ३ विद्यार्थांना पूर्नपरीक्षेसाठी पात्रता मिळाली आहे.
विद्यालयातुन सर्वप्रथम क्रिश प्रमोद चौधरी आला असुन त्याला एकूण ८८ टक्के मिळाले आहे.द्वितीय म्हणुन स्नेहा संतोष सावळे हिला ८७.४० टक्के मिळालेत.तृतिय नफिसा सुभान तडवी व निशा सुकदेव कोळी दोघींना ८४.८० टक्के मिळालेत. द्वितीय आलेली स्नेहा सावळे हिस इंग्रजी विषयात ८८ गुण मिळाले आहेत.
यशस्वी सर्व विद्यार्थांचे कौतुक श्री वासुदेवबाबा अध्यात्मिक व शैक्षणिक ट्रस्ट चे अध्यक्ष सुरेश चौधरी,उपाध्यक्ष साहेबराव पाटील,सचिव जगन्नाथ कोळी,प्राचार्य व्ही जी तेली,गटशिक्षणाधिकारी एजाज शेख,केंद्रप्रमुख प्रमोद सोनार,संस्थेचे सर्व संचालक,सर्व शिक्षक-शिक्षिका,वसतीगृह अधिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.











