सामनेर ता. पाचोरा (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने 15 जुलै ते 30 जुलै दरम्यान वृक्षारोपण कार्यक्रम अंतर्गत बांबरुड राणीचे तालुका पाचोरा येथील डॉ. राम मनोहर लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व मा.आ. दिलीप वाघ व चेअरमन तथा न. प.गटनेते संजय वाघ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यात वड, निंब, गुलमो हर अशा विविध प्रजातीच्या झाडांचे वृक्षाची लागवड केली गेली.
यावेळी स्थानिक चेअरमन दगाजी वाघ, पं. स. गटनेते ललित वाघ, पी. टी.सी. संचालक मधुकर पाटील, रमेश चौधरी, वि का सो चेअरमन मिलिंद वाघ, भास्कर मालठाणे, पांडुरंग पाटील , बाळकृष्ण पाटील,उपसरपंच जरीप तडवी, गुलाब तडवी ,राजेंद्र सोनार तसेच प्राचार्य बी.डी. बोरुडे, पर्यवेक्षक डी व्ही.पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन चे पालन करण्यात आले.









