जळगाव (प्रतिनिधी) – राज्य शासनाचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) यांनी गुरुवारी २९ ऑक्टोबर रोजी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या तथा मुदतवाढीचे आदेश काढले. यात जळगावच्या तिघांचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, मुंबईने गुरुवारी पत्रक जारी केले. यात जळगावचे राखीव पोलीस उपनिरीक्षक मदन शंकर चव्हाण यांची धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे. तसेच मोटार परिवहन विभागाचे पोलीस निरीक्षक पंकज योगीराज पवार यांची नाशिक ग्रामीण येथे बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी समीर शिवाजीराव मोहिते हे गट क्रमांक ८ येथून बदलून येत आहे. बिनतारी संदेश (वाहतूक) पोलीस उपनिरीक्षक इरफान इब्राहिम तडवी यांची नंदुरबारला बदली करण्यात आली आहे, तर त्यांच्याजागी बिनतारी संदेश औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक रमेश शहाजी घोरपडे येत आहेत.