जळगाव (प्रतिनिधी) – येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कासोदा पोलीस स्टेशन येथील गुन्ह्यातील घरफोड्यासह औरंगाबाद जिल्ह्यात विविध ठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना चार दुचाकीसह अटक करण्यात आली आहे.
एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील दिनेश दिलीप साळूंखे यांच्या घरात शिरून घरफोडी करणाऱ्या चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना माहिती मिळाली होती. वनकोठे ता. एरंडोल येथील एक तरुण गवंडी काम करतांना गावात चोऱ्या करतो त्यानुसार अजय हिरालाल मोहिते (वय-१९) रा. वनकोठे याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या चौकशीमध्ये त्याने दिनेश साळूंखेच्या घरी घरफोडी केल्याचे कबुल केले असून त्याला कासोदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
तर दुसऱ्या घटनेत औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद आणि सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतून दुचाकी चोरी झाल्या होत्या. त्याच्या तपासाबाबत जळगाव पोलिसांना देखील सूचना मिळालेल्या होत्या. त्यानुसार चोरीस गेलेल्या दुचाकी पाचोरा तालुक्यातील कल्पेश रवींद्र पाटील (वय-२८) शिवाजी कर्तारसिंग परदेशी (वय-४०) दोन्ही रा. सावखेडा, ता. पाचोरा यांच्या ताब्यात तसेच वरखेडी बस स्टॅन्ड येथे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार एलसीबीच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतेले. पुढील तपासासाठी खुलताबाद पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्याकडून चार दुचाकी (एम. एच. २०, एफ.जे. ६६२४,एम. एच. २०, एफ.एम. ६९५०, एम. एच. २०, एफ.डी. ८५२१, एम. एच. २०, एफ.आर. ९२७४) या जप्त करण्यात आल्या आहेत.